मध्य प्रदेश / सिंधिया यांचा थोड्य़ाच वेळात भाजप प्रवेश, राज्यसभा सदस्यत्वासह मंत्रिपद मिळण्याची शक्यता

भोपाळ - मध्य प्रदेशात आलेल्या राजकीय भूकंपानंतर अखेर आज ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थिती लावणार आहेत. याच...


भोपाळ - मध्य प्रदेशात आलेल्या राजकीय भूकंपानंतर अखेर आज ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थिती लावणार आहेत. याच दरम्यान, आता सिंधिया समर्थकांचा एक वर्ग त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करताना दिसून येत आहे. सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश न करता स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष स्थापित करावा अशी मागणी ग्वाल्हेर येथील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. वेगळा पक्ष काढा, सिंधिया समर्थकांची मागणी सिंधिया यांनी मंगळवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठवून केंद्रात मंत्रिपद दिले जाणार अशी शक्यता आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा बुधवारी केली जाऊ शकते. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या सरकारमधील ६ मंत्र्यांसह २२ आमदारांनी सिंधिया यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर येताच काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी ५ ते ७ आमदारांना मध्य प्रदेशात भाजपची सत्ता स्थापित झाल्यानंतर मंत्रिपद दिले जाणार असे सुत्रांकडून समजते. कुणाचे आमदार कुठे? मध्य प्रदेशात वाढत्या राजकीय हालचाली पाहता भाजपने आपल्या १०५ आमदारांना भोपाळमधून इतरत्र रवाना केले आहे. त्यामध्ये ८-८ आमदारांचे गट तयार करण्यात आले आहेत. या प्रत्येक गटातील एकाला ग्रुप लीडर करण्यात आले. हाच नेता आपल्या गटातील आमदारांवर नजर ठेवणार आहे. या सर्वच गटांना वेग-वेगळ्या वाहनांमध्ये दिल्ली, मानेसर आणि गुडगाव अशा विविध ठिकाणी पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे, सिंधिया समर्थक आमदार बुधवारी बंगळुरू येथून आणले जातील. मध्य प्रदेश विधानसभेत अविश्वास ठराव मांडण्यात आला तेव्हाच या आमदारांना भोपाळला नेले जाणार आहे. अन्यथा राज्यसभा निवडणुकीच्या वेळी अर्थात २६ मार्च रोजी भोपाळला बोलावले जाईल. सोबतच, भोपाळच्या बड्या नेत्यांचे दिल्ली दौरे अचानक वाढले आहेत. केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय सुद्धा दिल्ली दौऱ्यावर आहेत. हे आमदार सध्या बंगळुरूत बंगळुरूमध्ये थांबलेल्या सिंधिया समर्थक आमदारांना बुधवारी बंगळुरूतून दुसरीकडे हलवले जाणार आहे. यामध्ये आमदार प्रदुम्न सिंह तोमर, रघुराज कंसाना, कमलेश जाटव, रक्षा सरोनिया, जजपाल सिंह जज्जी, इमरती देवी, प्रभुराम चौधरी, तुलसी सिलावट, सुरेश धाकड, महेंद्र सिंह सिसोदिया, ओपीएस भदौरिया, रणवीर जाटव, गिर्राज दंडोतिया, यशवंत जाटव, गोविंद सिंह राजपूत, हरदीप डंग, मुन्ना लाल गोयल तसेच ब्रिजेंद्र यादव यांचा समावेश आहे.


हवामान