कांदा-बटाटा आयातीवरुन राजू शेट्टींची खोचक टीका

खासगी व्यापाऱ्यांकडून कांदा आणि बटाट्याची आयात करण्यात निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी टीका केली आहे. शेतकऱ्याचे उप्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने घेतलेली मोठी झेप आहे, असं...


खासगी व्यापाऱ्यांकडून कांदा आणि बटाट्याची आयात करण्यात निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी टीका केली आहे. शेतकऱ्याचे उप्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने घेतलेली मोठी झेप आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रानं आणलेल्या नव्या कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचे सांगत शेट्टी यांनी देशव्यापी आंदोलनात सहभाग घेतला होता. कांद्याच्या वाढलेल्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांद्याची आयात करण्यात आली असून दिवाळीपूर्वी आणखी २५ हजार टन कांदा येणार आहे, असे ग्राहक व्यवहारमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सांगितलं.

हवामान