राजस्थान रॉयल्सकडूनने पंजाबचा ७ गडी राखून पराभव; प्लेऑफचा मार्ग मोकळा

घ्झ्थ् च्या १३ व्या सीजनचा ५०वा सामना किंग्स इलेवन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स (RR) दरम्यान अबु धाबीमध्ये झाला. राजस्थानने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाबने राजस्थानला १८६ धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात राजस्थानकडून...


घ्झ्थ् च्या १३ व्या सीजनचा ५०वा सामना किंग्स इलेवन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स (RR) दरम्यान अबु धाबीमध्ये झाला. राजस्थानने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाबने राजस्थानला १८६ धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात राजस्थानकडून पंजाबचा ७ गडी राखून पराभव झाला. राजस्थानने १७.३ ओव्हरमध्येच हे लक्षा पार केले. स्टोक्स आणि उथप्पाने शानदार सुरुवात करुन दिली मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात चांगली झाली. ओपनर बेन स्टोक्सने २६ बॉलवर ५० रन आणि रॉबिन उथप्पाने २३ बॉलवर ३० रन केले. दोघांमध्ये ६० रनांची ओपनिंग पार्टनरशिप झाली. स्टोक्सने लीगममध्ये दुसरे अर्धशतक केले. यानंतर सॅमसनने ४८, स्टीव स्मिथने ३१ रन काढले. पंजाबकडून क्रिस गेलने शानदार ९९ रनांची खेळी केली. गेलला ९९ रनांवर जोफ्रा आर्चरने बोल्ड केले. पंजाबकडून गेलनंतर लोकेश राहुलने ४६ रनांची खेळी केली. खराब सुरुवातीनंतर पंजाबने डाव सांभाळला पंजाबने ४ विकेट गमावून १८५ रन केले. पंजाबने १ रनावर पहिली विकेट गमावली. मनदीप सिंह जोफ्रा आर्चरच्या बॉलवर बेन स्टोक्सकडे झेलबाद झाला. यानंतर गेलने लोकेश राहुल (४६) सोबत दुसऱ्या विकेटसाठी १२० रनांची पार्टनरशिप केली. शेवटी निकोलस पूरनने ९ बॉलवर २२ रन काढून संघाला चांगल्या स्कोअरपर्यंत नेले. राजस्थानचा हा १३ वा सामना आहे, जो संघासाठी एलिमिनेटरप्रमाणे आहे. हा सामना राजस्थानने हरल्यावर प्ले-ऑफची दार बंद आणि चेन्नईनंतर टुर्नामेंटमधून बाहेर जाणारी दुसरी टीम असेल. तर, पंजाब सीजनचा सातवा विजय मिळवून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहचेल. दोन्ही संघ पंजाब: लोकेश राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), मनदीप सिंह, क्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मैक्सवेल, दीपक हूडा, क्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह. राजस्थान: रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, स्टीव स्मिथ (कर्णधार), संजू सैमसन (विकेटकीपर), जोस बटलर, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, वरुण एरॉन आणि कार्तिक त्यागी.

हवामान