यूपीएससीची मुख्य परीक्षा ८ जानेवारीला, देशातील २४ शहरांमध्ये केंद्रे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने घेण्यात येणारी सनदी सेवा मुख्य परीक्षा येत्या 8 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. या मुख्य परीक्षेसाठी 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या पूर्व परीक्षेतून 10564 उमेदवार निवडण्यात आले आहेत. पूर्व...


केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने घेण्यात येणारी सनदी सेवा मुख्य परीक्षा येत्या 8 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. या मुख्य परीक्षेसाठी 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या पूर्व परीक्षेतून 10564 उमेदवार निवडण्यात आले आहेत. पूर्व परीक्षेतून निवडण्यात आलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरून 11 नोव्हेंबरपर्यंत यूपीएससीच्या अधिपृत वेबसाईटवर अपलोड करावा लागणार आहे. देशातील 24 शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात मुंबईसह अहमदाबाद, ऐझवाल, प्रयागराज, बंगळुरू, भोपाळ, चंदिगढ, चेन्नई, कटक, देहराडून, दिल्ली, दिसपूर, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कोलकाता, लखनौ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, सिमला, तिरूवनंतपुरम आणि विजयवाडा या शहरांचा समावेश आहे.

हवामान