शेअर बाजाराच्या निर्देशांकात घट

मुंबई - शेअर बाजारात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण आजही कायम राहिले. गुंतवणूकदारांकडून नफेखोरी चालूच असल्यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकात घट झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेस १३५ अंकांनी म्हणजे ०.३४ टक्‍क्‍यांनी...


मुंबई - शेअर बाजारात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण आजही कायम राहिले. गुंतवणूकदारांकडून नफेखोरी चालूच असल्यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकात घट झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेस १३५ अंकांनी म्हणजे ०.३४ टक्‍क्‍यांनी कमी होऊन ३९,६१४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २८ अंकांनी कमी होऊन ११,६४२ अकाउंटवर बंद झाला. बाजारातील घडामोडींबाबत एलकेपी सिक्‍युरिटी या संस्थेचे संशोधन प्रमुख एस रंगनाथन यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील अनिश्‍चिततेमुळे नफेखोरी चालू आहे. वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची नफेखोरीसाठी जास्त विक्री झाली. तोळेबंदातील तोटा कमी झाल्यामुळे व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरच्या भावांमध्ये साडेपाच टक्‍क्‍यांची वाढ झाली. टाटा स्टील, सनफार्मा, नेस्ले, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. धार्मिक उत्सवामुळे आज चलन बाजार बंद होता. कोणत्या कंपन्यांचे शेअर घसरले : भारती एअरटेल, मारुती, बजाज फायनान्स, एचयुएल, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक.

हवामान