मराठड्यासह अन्य भागात सुद्धा जोरदार पाऊस तर काही ठिकाणी पूरस्थिती
हवामान खात्याच्या पावसाचा अंदाज खरा ठरला आहे. मराठवाड्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. अनेक धरणं भरलीयत. नांदेड, परभणी, हिंगोली, बीड भागात तर पूरस्थिती आहे. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून ४ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झालीये.सलग तीन दिवस परभणी जिल्ह्यात पावस सुरुच आहे. गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढलंय. त्यामुळे जिल्ह्यातील ओढे नाले नद्याना पुर आलाय. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण शंभर टक्के भरलंय. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं निम्म्या मराठवाड्याची तहान भागवलीय मराठवाड्यातील दुधना, माजलगाव, बिंदुसरा, विष्णुपुरी, सिद्धेश्वर, मनार ही धरणं पूर्ण भरलीयेत. तर इसापूर आणि येलदरी धरण भरण्याच्या मार्गावर आहेत. अनेक लहान मध्यम प्रकल्प सुद्धा ओव्हरफ्लो झालेत. लातूरची तहान भागावणा-या मांजरा प्रकल्पात ५१ टक्के पाणीसाठा झाल्यानं लातूरकरांची पाण्याची चिंता मिटलीय. जायकवाडी धरण मात्र अजूनही भरण्याच्या प्रतीक्षेत आहे, धरणात ४५ टक्के पाणीसाठा आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य