• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


नोटबंदीला पाच वर्ष पूर्ण तर जाणून घ्या जुन्या नोटांचं झालं काय ?


८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होताआजपासून बरोबर पाच वर्षांपूर्वी म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. नोटाबंदीनंतर सर्व लोकांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांच्या जागी नवीन नोटा घेतल्या. आता ५०० आणि १००० ऐवजी ५०० आणि २००० च्या नव्या नोटा चलनात आल्या. ५०० आणि १००० रुपयांच्या RBI ने लोकांकडून १५. २८ लाख कोटी रुपयांच्या ५०० आणि १००० च्या नोटा जमा केल्या होत्या आणि त्या बदल्यात नवीन नोटा जारी केल्या होत्या. अशा परिस्थितीत हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे की १५ लाख कोटींहून अधिक रकमेचे काय झालं आणि आता त्या नोटा कुठे आहेत? आरबीआयच्या नियमांनुसार, या नोटांची पडताळणी आणि प्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या ब्रिकेट प्रणालीद्वारे विटा तयार केल्या जातात. RBI च्या म्हणण्यानुसार, जुन्या नोटा चलन पडताळणी प्रक्रिया प्रणाली (CVPS) पद्धतीने विघटित केल्या जातात. पहिल्या टप्प्यात हे चलन नष्ट करणे योग्य आहे की नाही हे पाहिले जाते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात श्रेडिंग ब्रिकेट प्रणालीद्वारे मशीनच्या साहाय्याने नोटांचे बारीक तुकडे केले जातात. यानंतर त्याचं विघटन केलं जाऊन त्यांना विटांचा आकार दिला जातो. पुठ्ठ्यासारख्या अनेक वस्तू या विटांमधून बनविल्या जातात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (NID), अहमदाबादच्या विद्यार्थ्यांनी घरात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू या नोटांच्या रद्दीपासून बनवल्या आहेत. वास्तविक, आरबीआयने अहमदाबादच्या एनआयडीकडे मदत मागितली होती आणि त्यानंतर मुलांनी या नोटांच्या तुकड्यांपासून उशा, टेबल लॅम्पसारख्या वस्तू बनवल्या.जुन्या नोटांची खासियत म्हणजे त्या पाण्यात विरघळत नाहीत आणि त्यांचा रंग सुटण्याची समस्याही येत नाही, त्यामुळे अनेक गोष्टी सहज बनवल्या जात आहेत. मात्र, या नोटांच्या पुनर्वापराचे काम आरबीआय करत नाही.


महत्वाच्या बातम्या
हवामान