• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


महाराष्ट्रात तब्बल 'एवढी' लोकसंख्या कुपोषित


महाराष्ट्रात ३६.०९ टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचितNITI आयोगाने नुकताच भारताचा राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालानुसार, सर्वाधिक लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रात ३६.०९ टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित आहे. मात्र, हा आकडा गुजरातपेक्षा कमी आहे. गुजरातमध्ये ४१.३७ टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित आहे.तर, पश्चिम बंगालमध्ये ३३.६२ टक्के, कर्नाटकमध्ये ३३.५६ टक्के आणि तेलंगणात ३१.१० टक्के लोक संख्या योग्य पोषणापासून वंचित आहेत. एखादं कुटुंब पोषणदृष्ट्या वंचित मानले जाते, जर त्या घरात ० ते ५९ महिने वयोगटातील कोणतेही बालक किंवा 15 ते 49 वर्षे वयोगटातील महिला किंवा १५ ते ५४ वर्षे वयोगटातील पुरुष कुपोषित असल्याचे आढळते.


महत्वाच्या बातम्या
हवामान