• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


मुख्यमंत्री राज्यात निर्बंध लावण्याबाबत करणार पंतप्रधानांशी चर्चा !


नव्या विषाणू ओमिक्रोनच्या पार्शवभूमीवर राज्याचा मंत्र्यांनी केली पंतप्रधान मोदींशी नियमावलीबद्दल बोलण्याची मुख्यमंत्र्यांना मागणीमुख्यमंत्री राज्यात निर्बंध लावण्याबाबत करणार पंतप्रधानांशी चर्चा ! द. आफ्रिकेतील कोविडच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणुच्या प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असं सांगितलं. अचानक काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट सर्वात मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रीया या देशांमध्ये दर दिवशी हजारांच्या घरात रुग्ण सापडतात आहे. हा विषाणू सर्वात अधिक पसरतो अत्यंत धोकादायक हा विषाणू असल्याचे सांगितले. सध्या संपूर्ण जगात हि पुन्हा एक डोकंदुखी झाली आहे. ओमिक्रॉन विषाणुचे ५० पेक्षा जास्त १ म्युटेशन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नियमावली बाबत चर्चा करावी, सर्व मंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा करावी मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे.


महत्वाच्या बातम्या
हवामान