• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर राज्यपालचं जोरदार प्रतिउत्तर


मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील या धमकीवजा भाषेवरच राज्यपाल कोश्यारी यांनी बोट ठेवून प्रतिक्रिया दिली आहेराज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिले. पत्रात असे लिहले होते की, तुम्हाला विधीमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. नको त्या विषयात पडू नका, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील या धमकीवजा भाषेवरच राज्यपाल कोश्यारी यांनी बोट ठेवून प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल उत्तर देतांना म्हंटले कि, तुम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी १० ते ११ महिन्याचा वेळ घालवला. महाराष्ट्र विधानसभा नियम सहा आणि सातमध्ये सुधारणा करण्यात आली. अशाप्रकारे या दुर्गम सुधारणांचे परिणाम कायदेशीररित्या तपासले जाणं आवश्यक आहे. मी सभागृहाचा कार्यपद्धती आणि कार्यवाहिच्या बाबतीत त्याच्या विशेष अधिकारावर कधीही प्रश्न उपस्थित केले नाही. पण प्रथम दर्शनीय दिसणाऱ्या प्रक्रियेस संमती देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही. घटनेच्या अनुच्छेद २०८ मध्ये नमूद केल्यानुसार असंवैधानिक आणि बेकायदेशीर असणे राज्यपालांच्या सर्वोच्च घटनात्मक कार्यालयाची अवहेलना आणि बदनामी करण्याच्या तुमच्या पत्रांचा संयमी स्वर आणि धमकीवजा शब्द पाहून मी व्यक्तीरित्या दुखी आणि निराश झालो आहे, मी संविधानाचा रक्षक आहे. मला सर्व संविधानिकबाबी तपासून निर्णय घ्यावा लागतो. तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही, अशी प्रखर आणि तिखट प्रतिक्रियाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे.


महत्वाच्या बातम्या
हवामान