• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


चिंताजनक ! देशात तिसऱ्या लाटेला सुरुवात ; दिल्ली मुंबई सारख्या शहरात समूह संसर्गाला सुरवात


जवळपास आठ महिन्यांनंतर शहरात इतकी मोठी रुग्णसंख्या आढळली होती.केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात मागील २४ तासांमध्ये १३१५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तिसऱ्या लाटेची आता बळकट झालेले दिसून येत आहे. मुंबई, दिल्ली आणि बिहारमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचंही सांगण्यात आले आहे.बुधवारी मुंबईत कोरोनाचे २५०० हून अधिक नवे रुग्ण आढळले. जवळपास आठ महिन्यांनंतर शहरात इतकी मोठी रुग्णसंख्या आढळली होती. नव्या संसर्गामध्ये ओमायक्रॉनची लागण ८० टक्क्यानं निरीक्षणात आली आहे. ज्यामुळं इथंही समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत या विषाणूच्या संसर्गानं धोक्याची पातळी ओलांडल्याचं कळत आहे. दिल्लीचे आरोग्यमत्री सत्येंद्र जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार इथं समूह संसर्ग अर्थात कम्युनिटी ट्रान्समिशनची सुरुवात झाली आहे.


महत्वाच्या बातम्या
हवामान