• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


........ तर राज्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार


धोका जास्त वाढल्याने राज्य सरकार राज्यात निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेकेंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात मागील २४ तासांमध्ये १३१५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तिसऱ्या लाटेची भीती आता बळकट झालेले दिसून येत आहे. राज्यात ही कोरोनाच्या रुग्णात अचानक वाढ होत असल्यामुळे धोका जास्त वाढल्याने राज्य सरकार राज्यात निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कोरोना बाधित आणि कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास निर्बंध कडक करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. कोरोनाचे नियम पाळले नाही तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज टास्क फोर्सशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे त्यानंतर कोविड नियमाबाबत पुढेचे पाऊल उचलण्यात येणार आहे. मात्र, त्याआधीच अजित पवार यांनी कडक नियम करण्याचे संकेत दिलेत.मुंबई, पुण्यात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारी घ्यावी लागेल. कोरोनाच्या केसेस वाढल्या नंतर निर्बंध हे कडक करावेच लागतील. संसर्ग आधीपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. ओमायक्रोनचा समूह संसर्ग सुरू झाला, अशी चर्चा आहे. मात्र त्याबद्दल ठोस माहिती नाही. या विषयात तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहे, असे अजित पवार म्हणाले.


महत्वाच्या बातम्या
हवामान