• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


राज्यात लॉकडाऊन लागणार का ? वाचा काय म्हणाले आरोग्यमंत्री


प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने लॉकडाऊनची परिभाषा सुरू आहेराज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात जाऊन टोपे यांनी या लसीकरण मोहिमेचा घेत असताना. यावेळी त्यांनी राज्यात लॉकडाऊन लागणार काय? राज्याला किती आणि कोणत्या लसींची आवश्यकता आहे आणि नेमका कोणता मास्क लावावा,या प्रश्नांचे उत्तर त्यांनी दिले. ते म्हणाले, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी त्यांच्यापुढे लॉकडाऊनचा मुद्दा मांडण्यात आला. महाराष्ट्रात बेड ऑक्युपन्सी म्हणजे उपलब्ध बेड किती? ऑक्यूपाय किती झाले? समजा ४० टक्क्यांपर्यंत ऑक्यूपाय झाले आणि ऑक्सिजन कन्झम्प्शन दररोजचं ७०० मॅट्रीक टन वाढलं तर महाराष्ट्रात लॉकडाऊन करावं असा निकष लावून आम्ही परिभाषा केली आहे. आता प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने लॉकडाऊनची परिभाषा सुरू आहे. हरियाणात लॉकडाऊन लागल्याचं कळलं. दिल्लीतही चर्चा आहे. आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना सांगितलं, एकच परिभाषा असावी. आयसीएमआरने सर्वच राज्यांना निर्बंध आणि लॉकडाऊनबाबत समान नियम लागू केला पाहिजे.


महत्वाच्या बातम्या
हवामान