• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


राज्यातील महाविद्यालय पुन्हा बंद


१५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलीराज्यात अचानक वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळं राज्यसरकारने महाविद्यालयाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालये ही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तो पर्यंत ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.खासगी विद्यापीठांना सुद्धा हा निर्णय लागू होणार आहे. राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात काल सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाईन बैठक झाली. महाविद्यालया संबंधी सर्व घटकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय सुद्धा काल घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये काही अडचणी येत असतील तर महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी हेल्पलाइन नंबर देण्याचा सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयासोबत वस्तीगृहदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे विद्यार्थी परदेशातून व इतर राज्यातून आले आहेत त्यांच्यासाठी वस्तीगृहाची सुरू ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत.


महत्वाच्या बातम्या
हवामान