• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


गृहमंत्र्यांनी पोलिसांबाबतीत घेतला 'हा' मोठा निर्णय


राज्यातील पोलिसांना देखील ‘वर्क फ्रॉम होम’ करता येणार आहेराज्यात नवं वर्षाचा सुरवात अचानक वाढलेल्या रुग्णांचा संख्येमुळे आणि कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे चांगलेच भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत सुद्धा मोठी वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने पोलिसांबाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे आता राज्यातील पोलिसांना देखील ‘वर्क फ्रॉम होम’ करता येणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. गृहमंत्री म्हणाले, राज्यातील पोलिसांना देखील कोरोना विषाणूचा सामना करावा लागत आहे.नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास तत्पर राहावं लागत आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. ५५ वर्षांवरील पोलिस कर्मचाऱ्यांनी ड्यूटीवर येण्याची आवश्यकता नाही. ते वर्क फ्रॉम होम करु शकतात. याबाबत आदेश देण्यात आले आहेत.


महत्वाच्या बातम्या
हवामान