• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रावर ड्रोन हल्ल्याची भीती ; डार्कनेटवर आखला डाव


मुंबई सह महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांना हा इशारा देण्यात आला आहेकाही दिवसांवर प्रजासत्ताक दिन असताना महाराष्ट्रावर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. राज्यात ड्रोनच्या साहाय्याने हल्ला होण्याचा धोका व्यक्त केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत हा इशारा आला दिला आहे. मुंबई सह महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांना हा इशारा देण्यात आहे. नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचे सांगितले आहे. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये संभाव्य ड्रोन हल्ल्यांबाबत केंद्रीय तपास यंत्रणा सतत सतर्कतेची सूचना देत असतात. तपास यंत्रणांना नुकतेच अशी माहिती मिळाली आहे की, डार्क नेटचा वापर करुन मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्या घडवण्याबद्दल दहशतवादी संभाषण करत आहेत. महाराष्ट्रात लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा बसवावी, अशी मागणी केली जाते.


महत्वाच्या बातम्या
हवामान