• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ ; काल आढळले एवढे रुग्ण


देशात आतापर्यंत १५३ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेदेशातील कोरोना रुग्णांची संख्येत दिवसांदिवस वाढ होत चालली आहे. कोरोना संकट आणखीच गढद होत चालले आहे. काल देशात दिवसभरात १ लाख ९४ हजार ७२० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. काल दिवसभरात ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ९ लाख ५५ हजार ३१९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. देशात सध्याचा कोरोना रुग्ण वाढीचा दर ११.०५ टक्के एवढा झाला आहे. देशात ओमीक्रॉनचे रुग्ण सुद्धा वाढत आहेत. देशात ओमिक्रॉनबाधितांची संख्या ४ हजार ६८६ वर पोहोचली आहे. देशात कोरोनाच्या संक्रमणात लसीकरण मोहीम मोठ्या जोमात सुरू आहे. देशात आतापर्यंत १५३ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.


महत्वाच्या बातम्या
हवामान