• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


राज्यात कोरोना रुग्णांची तुफान वाढ ! परिस्थिती चिंताजनक


राज्यात आज ८६ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंदराज्यातील रुग्णसंख्येमध्ये नवं वर्षात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. आज राज्यासाठी मोठी चिंतेची गोष्ट समोर आले ahem गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या ४६,०४१ नव्या रुग्णांची भर झाली असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात २८,०४१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात मंगळवारी ३४,४२४ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत आज जवळपास १२ हजार अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात आज ८६ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत १३६७ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी ७३४ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.


महत्वाच्या बातम्या
हवामान