एटापल्ली (गडचिरोली): येथील पंचायत समिती मालकीच्या जागेवर स्वखर्चने व्यवसायी गाळे बांधून देण्याचे पत्र देवून तीस लाख रुपयांची फसवणूक तत्कालीन गटविकास अधिकारी व सभापती यांनी केली असल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा प्रशासनास...
एटापल्ली (गडचिरोली): येथील पंचायत समिती मालकीच्या जागेवर स्वखर्चने व्यवसायी गाळे बांधून देण्याचे पत्र देवून तीस लाख रुपयांची फसवणूक तत्कालीन गटविकास अधिकारी व सभापती यांनी केली असल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनातून केला आहे. मार्च २०१६ मध्ये पंचायत समिती मालकीच्या जागेवर तालुक्यातील शुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायी गाळे बांधून दिले जाणार असल्याच्या माहिती वरुन अर्ज केल्या नंतर तीन लाख रुपये भरले. नंतर गाळा बांधकाम करुण देण्यात येईल असे पत्र देण्यात आले. त्यानुसार आम्ही प्रत्येकी तीन लाख रुपये डिमांड ड्राफ् द्वारा पंचायत समितीच्या नावे भरना केला. मात्र, दोन वर्षाचा कालावधी होवूनही आम्हास व्यवसायी गाळे बांधून देण्यात आले नाही, त्यामुळे आमचे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. नातेवाईकांकडून उसनवार करुण सदर रक्कम आम्ही भरना केल्याचे निवेदनात म्हटले आहे. स्थानिक प्रशासनाला वारंवार विचारणा करूनही न्याय मिळत नाही, त्यामुळे सदर प्रकरणी चौकशी करुण न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सारिका आईलवार यांना दिलेल्या निवेदनातून संतोष खापने, नरोत्तम अधिकारी, श्रीनिवास कंबगोनी, महेश मोहूर्ले, प्रफुल आईलवार, पंकज पत्तिवार, दिलीप पुपरेड्डीवार, सुनील हमंद व तपन तपाली यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य