शेतकऱ्यांचा रस्ता रोको

केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य वाढवून कांदा निर्यात बंद केली त्यामुळे कांद्याचे दर कोसळले होते. परिणामी येवला तालुक्यातील पुरणगाव येथील शेतकऱ्यांनी बाबासाहेब थेटे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव नेऊर येथील नाशिक-औरंगाबाद राज्य...केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य वाढवून कांदा निर्यात बंद केली त्यामुळे कांद्याचे दर कोसळले होते. परिणामी येवला तालुक्यातील पुरणगाव येथील शेतकऱ्यांनी बाबासाहेब थेटे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव नेऊर येथील नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गावर गेल्या आठवड्यात रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून जमाव बंदीचा आदेश लागू असल्याने पोलिस निरीक्षकांच्या मध्यस्थीने हा रास्ता रोको रद्द करण्यात आला होता. मात्र आता या शेतकऱ्यांनी येत्या मंगळवारी (दि. ५) पुन्हा रस्त्यावर उतरत 'रास्ता रोको' करण्याचा इशारा दिला आहे. कांद्यावरील निर्यातमूल्य केंद्र सरकारने त्वरित रद्द करावे यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी येवला तहसीलदारांना तालुक्यातील जळगाव नेऊर येथे रास्ता रोको करण्यासंदर्भात लेखी निवेदनही दिले होते. मात्र, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना समजावत जिल्ह्यात सध्या जमावबंदी आदेश जारी असल्याने रास्ता रोको करू नका, असे सांगितले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा या शेतकऱ्यांनी कांद्याबाबत सरकारने न्याय न दिल्यास मंगळवारी (दि. ५) रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन यावेळी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर व मंडल अधिकारी मंगेश धवन यांना देण्यात आले. सरकारने शेतकरी, शेतीमाल दराबाबत विरोधी धोरण स्वीकारल्यावर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात कांद्याच्या निर्यातमुल्यात सरकारने हस्तक्षेप केला आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे. या वेळी मच्छिंद्र ठोंबरे, सोपान ठोंबरे, माणिक ठोंबरे, वाळुबा सोनवणे, चिंधू वरे, प्रकाश शिंदे, लहानू मढवई, सर्जेराव सोनवणे, रावसाहेब घुले, सुरेश वाघ, ज्ञानदेव तिपायले, बंडू शिंदे, विजय जाधव, संदीप पगार आदी उपस्थित होते.

हवामान