भारताचा सामाजिक इतिहास मांडला जाईल रेल्वे ही केवळ एका प्रांतापुरती मर्यादित नसून तिचा विस्तार संपूर्ण देशभरात झाला आहे. या रेल्वेचा इतिहास पाहताना देशाची स्वातंत्र्य चळवळ ते नवीन तंत्रज्ञान आदी साऱ्यांचा समावेश होता. पूर्वी...
भारताचा सामाजिक इतिहास मांडला जाईल रेल्वे ही केवळ एका प्रांतापुरती मर्यादित नसून तिचा विस्तार संपूर्ण देशभरात झाला आहे. या रेल्वेचा इतिहास पाहताना देशाची स्वातंत्र्य चळवळ ते नवीन तंत्रज्ञान आदी साऱ्यांचा समावेश होता. पूर्वी संस्थानांत विभागलेली भौगोलिक सीमा रेल्वेच्या जाळ्यामुळे पुसली गेली. या साऱ्याकडे सूक्ष्म दृष्टीने पाहताना रेल्वे वस्तुसंग्रहालय हे समाजाशी दुवा, सांगड घालणारा प्रवास मांडू शकते. संपूर्ण देशाचा विचार करताना रेल्वेची भूमिका व्यापक आहे. त्यामुळे समाजाची जडणघडण, त्यातील बदल या साऱ्यांचा त्यातून वेध घेता येईल. जगात काही ठिकाणी तर दिल्लीमध्येही रेल्वे वस्तुसंग्रहालय आहे. पण ही संकल्पना पूर्णतः वेगळी असणार आहे. साधारणपणे इतिहास, कला मांडत असताना या रेल्वे वस्तुसंग्रहालयातून लोकांना अनेकविध कथा सांगता येतील, असे त्याचे स्वरुप असले पाहिजे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सीएसएमटीतील हेरिटेज वास्तूस भेट दिली तेव्हा आम्ही त्यांच्यासमोर ही संकल्पना मांडली. त्यांनाही ही संकल्पना आवडली आहे. त्यास संमती मिळून प्रत्यक्ष वास्तू तयार होईल, तेव्हा त्याचे महत्त्व लक्षात येईल. या पद्धतीचे वस्तुसंग्रहालय वेगळ्या तऱ्हेचे असावे, त्यात मुख्यतः भारताचा सामाजिक इतिहास मांडता येईल. रेल्वे आणि त्यानुषंगाने होत जाणारे बदल वस्तुसंग्रहायलातून टिपता येतील. जगाला माहिती देण्याचे काम त्यातून साधता येईल. त्यात दृकश्राव्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने संपूर्ण माहिती पोहोचवता येऊ शकेल. अशा तऱ्हेने थेट जनसामान्यांशी जोडण्याचे काम या वस्तुसंग्रहालयातून शक्य होईल. रेल्वेच्या अंगाने देशाचा आढावा घेण्याचे काम त्यातून साध्य होऊ शकेल. रेल्वेचा देशाच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे, त्याचे प्रत्यंतर समाजातील विविध बदलांतून दिसते. हा सारा पट वस्तुसंग्रहालयातून समोर येऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य