मुंबईला आजपासून दूध दरवाढीचा फटका!

नवी मुंबई : ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवली या शहरी विभागात तबेलेवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात दुधाचा पुरवठा होत असतो. उन्हाळ्यात पाण्याअभावी गुरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण होत असतो. चार्‍याच्या टंचाईमुळे जनावरांकरिता...नवी मुंबई : ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवली या शहरी विभागात तबेलेवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात दुधाचा पुरवठा होत असतो. उन्हाळ्यात पाण्याअभावी गुरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण होत असतो. चार्‍याच्या टंचाईमुळे जनावरांकरिता वाढीव किमतीने चारा खरेदीने तबेलेवाले हैराण आहेत. त्याबरोबरच चारा वाहतुकीच्या खर्चातही वाढ झाली. शिवाय दोन वर्षांपासून त्यांच्या दुधाच्या दरात न झालेली वाढ. परिणामी मुंबई व उपनगरांत येत्या १ एप्रिलपासून दोन ते तीन रुपयांनी वाढ होण्याच्या शक्यतेने या शहरातील नागरिकांना आणखी किंमत मोजावी लागेल. वरील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात तबेलेवाल्याकंडून दुधाचा पुरवठा करण्यात येत असतो. वाढत्या उष्म्यामुळे विहीर व जलस्थळाच्या पाण्याची पातळी खोल गेली, काहींचे पाण्याचे प्रमाण कमी झाले, तर काही जलस्रोत आटले.जादा शुल्काने वाढलेले जनावरांचे पशुखाद्य शिवाय चारा,गवत यांची वाढती प्रखर टंचाई. त्याचप्रमाणे चार्‍याच्या वाहतुकीसाठी लागणारा वाहतूक खर्चही मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचाही भुर्दंड तबेलेवाल्यांवर पडला.शिवाय गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी दुधाचा दर न वाढविल्याने सध्याच्या भावात दूध विक्री करणे त्यांना परवडत नाही. म्हणून सध्याच्या भावात दूधविक्री करणे गोठेवाल्यांना शक्य होत नसल्याने त्याची भाववाढ अटळ आहे.

हवामान