औरंगाबाद : सिडकोला पाणी देण्यास नागरिकांचा विरोध, काम बंद पाडले

औरंगाबाद : हनुमाननगर जलकुंभावरून सिडको-एन-३, एन-४ भागाला पाणी देण्यासाठी सुरू असलेली जलवाहिनी टाकण्याचे काम नागरिकांनी बंद पाडले. महिलांचा रोष पाहून खोदकाम करणार्‍या मजुरांनी काम सोडून पळ काढला. त्यानंतर नागरिकांनी पाईपलाईन...औरंगाबाद : हनुमाननगर जलकुंभावरून सिडको-एन-३, एन-४ भागाला पाणी देण्यासाठी सुरू असलेली जलवाहिनी टाकण्याचे काम नागरिकांनी बंद पाडले. महिलांचा रोष पाहून खोदकाम करणार्‍या मजुरांनी काम सोडून पळ काढला. त्यानंतर नागरिकांनी पाईपलाईन टाकण्यासाठी केलेले खड्‍डे बूजवून टाकले. यावेळी चौकात सुमारे दीडशे ते दोनशे आंदोलक जमल्याने मोठा गोंधळ सुरू होता. गेल्या वर्षी या भागातील नागरिकांनी पुंडलिकनगर जलकुंभावरून सिडकोसाठी पाईपलाईन टाकण्याचे काम अनेकदा बंद पाडले होते. तेव्हापासून हे काम बंद होते. परंतु, सोमवारी (दि. ६) मनपा प्रशासन सिडकोला पाणी देण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम पुन्हा सुरू केले. हे समजल्‍यानंतर भागातील नगरसेवकासह महिला-नागरिक एकवटले. मनपा विरोधी घोषणा देत नागरिकांनी जलवाहिनी टाकण्याच्या कामास विरोध केला. सिडकोला पाणी देण्यास विरोध नाही. परंतु या टाकीवरुन आम्हालाच पाणी मिळत नाही. तर त्यांना कुठून देणार? असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. यासंबधी आयुक्तांची भेट घेणार असल्याचे नगरसेवक आत्माराम पवार यांनी सांगितले.

हवामान