दैनिक सामपत्र ऑनलाईन प्रतिनिधी/मुंबई : ज्या व्यक्तींना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाणे शक्य नाही,अशा ज्येष्ठ नागरिक आणि विकलांग व्यक्तींना लस मिळावी यासाठी 'घरोघरी लसीकरणाचा' निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या उपक्रमाची सुरुवात १...
दैनिक सामपत्र ऑनलाईन प्रतिनिधी/मुंबई : ज्या व्यक्तींना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाणे शक्य नाही,अशा ज्येष्ठ नागरिक आणि विकलांग व्यक्तींना लस मिळावी यासाठी 'घरोघरी लसीकरणाचा' निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या उपक्रमाची सुरुवात १ ऑगस्टपासून मुंबई येथून करण्यात येणार आहे.यासंदर्भातील माहिती मुंबई महानगरपालिकडून उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. घरोघरी लसीकरणाचा गांभीर्यांने विचार करा,अशा सूचना न्यायालयाकडून मुंबई महापालिका तसेच राज्य सरकारला देण्यात आल्या होत्या.त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज कोरोना संदर्भातील याचिकांवर सुनावणी झाली.सुनावणी दरम्यान राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी १ ऑगस्टपासून मुंबईत घरोघरी लसीकरण सुरु करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.तसेच घरोघरी दिल्याजाणाऱ्या या लसी महापालिकेतर्फे मोफत देण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ वकील अॅड. अनिल साखरे यांनी दिली. दरम्यान,विकलांग तसेच अंथरुणावरून उठूही शकत नाही अशा नागरिकांच्या लसीकरणासाठी पालिकेकडून एक ईमेल आयडी तयार करण्यात आला असून यावर गरजूंनी माहिती पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य