• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


या तारखेला होणार पाचवी ते दहावीची शिष्यवृत्ती परीक्षा...!

प्रतिनिधी/औरंगाबाद : पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे.यापूर्वी शिक्षण विभागाकडून ही परीक्षा ९ ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरविण्यात आले होते.मात्र,परीक्षा परिषदेकडून ही परीक्षा...प्रतिनिधी/औरंगाबाद : पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे.यापूर्वी शिक्षण विभागाकडून ही परीक्षा ९ ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरविण्यात आले होते.मात्र,परीक्षा परिषदेकडून ही परीक्षा १२ ऑगस्टला घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रत्येकवर्षी पूर्व उच्च माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या रविवारी घेण्यात येते.मात्र,यंदा या परीक्षेची तारीख सहा वेळा बदलण्यात आली आहे.त्यामुळे सुरुवातीला ही परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या जागी १५ एप्रिलला घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान,आता शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १२ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलेजा दराडे यांनी पत्र जारी केले आहे.तसेच या परीक्षेसाठी अगोदर जारी करण्यात आलेले प्रवेश पत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत.


महत्वाच्या बातम्याहवामान