• 25 June 2022 (Saturday)
  • |
  • |


पुणेकरांना दिलासा ; आज पासून पुण्याच्या निर्बंधात शिथिलता

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार आहेत तर शहरातील हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त शनिवारी आणि...पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार आहेत तर शहरातील हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त शनिवारी आणि रविवारी या सर्व गोष्टींना दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरातील मॉल्स रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. पण मॉलमध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी देण्यात आली आहे राज्यातील कोरोनाच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणत आली अनलॉकबाबत नवीन नियमावली जारी करण्यात आली होती. त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश नसल्याने या ठिकाणचा व्यापारी वर्ग नाराज झाला होता. गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून पुण्यातील निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल दुपारी तीन वाजता एक आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर पुणेकरांना निर्बंधात सूट देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.पुण्यातील पॉझिटिव्हिटी दर जर ७ टक्क्यांच्या वर गेला तर पुन्हा निर्बंध लावण्यात येतील असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान