• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


मराठा सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी अशोकराव महाले

वाशिम दि.०२:(जिल्हा प्रतिनिधी) मराठा सेवा संघ या बुध्दीप्रामाण्यवादी व पुरोगामी चळवळीच्या राज्य उपाध्यक्षपदी मराठा सेवा संघाचे विद्यमान अकोला विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोकराव महाले ( वाशिम ) यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच नांदेड...वाशिम दि.०२:(जिल्हा प्रतिनिधी) मराठा सेवा संघ या बुध्दीप्रामाण्यवादी व पुरोगामी चळवळीच्या राज्य उपाध्यक्षपदी मराठा सेवा संघाचे विद्यमान अकोला विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोकराव महाले ( वाशिम ) यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच नांदेड येथे पार पडलेल्या मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष विजयराव घोगरे यांच्या निर्देशानुसार राज्य कार्याध्यक्ष अर्जुनराव तनपुरे, महासचिव मधुकरराव मेहेकरे यांनी नियुक्ती पत्र देऊन ही निवड केली आहे. महाले यांनी १९९७ मध्ये मराठा सेवा संघात कळंबा महाली येथे शाखाध्यक्ष मधुकर महाले यांच्यासोबत ग्राम शाखा सदस्य म्हणून काम केले आहे. त्यानंतर १९९९ मध्ये जिल्हा सहसचिव म्हणून जिल्हाध्यक्ष शंकरराव अंभोरे यांच्यासोबत संघटन वाढविण्याचे काम केले. त्यानंतर २००१ मध्ये दिवंगत सुभाषराव गायकवाड, अनिल पाटील, दिलीपराव चव्हाण, वसंतराव अवचार, राजूभाऊ चौधरी, विशाल वानखेडे, ज्ञानेश्वर वाघ, नारायणराव काळबांडे यांच्या समवेत जिल्हा सरचिटणीस म्हणून चळवळ वाढविली. कामात सातत्य ठेवल्याने २००३ मध्ये महाले यांना जिल्हाध्यक्ष म्हणून संधी मिळाली. सात वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर २०११ मध्ये विभागीय अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली. या काळात चळवळ वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. याच योगदानाचा विचार करता त्यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे शिवश्री अशोकराव महाले यांच्याकडे पहिल्या टप्प्यात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये चळवळ वाढविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महाले यांच्या निवडीचे सामाजिक वर्तुळात स्वागत होत आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान