• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


देशाचे अंतिम हिंदू हृदयसम्राट पृथ्वीराज चौहाण यांच्या नावाचा अनादर होऊ देणार नाही- श्यामसिह ठाकूर

वाशिम दि.०८: (अजय ढवळे) भारत देशाचे अंतिम हृदयसम्राट शुरवीर पृथ्वीराज चौहाण यांच्या नावाचा एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्या दिर्गदर्शकाचा चित्रपट पृथ्वीराज या चित्रपटाच्या नावात सुधारणा न केल्यास सदर चित्रपट देशात रिलीज होऊ देणार आणि असा...वाशिम दि.०८: (अजय ढवळे) भारत देशाचे अंतिम हृदयसम्राट शुरवीर पृथ्वीराज चौहाण यांच्या नावाचा एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्या दिर्गदर्शकाचा चित्रपट पृथ्वीराज या चित्रपटाच्या नावात सुधारणा न केल्यास सदर चित्रपट देशात रिलीज होऊ देणार आणि असा गंभिर इशारा आज वाशिम येथे राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्यामसिह ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला.आहे. येत्या काही दिवसांमध्ये देशात यशराज बॅनरच्या माध्यमातून भारताचे अंतिम हृदय सम्राट पृथ्वीराज चौहाण यांच्या जीवनपठावर आधारित एक चित्रपट रिलीज होणार आहे त्या चित्रपटामध्ये मध्ये हृदयसम्राट असा नामोल्लेख न करता *पृथ्वीराज* असा एकेरी भाषेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारचे कृत्य केले आहे,यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच हिंदुस्ताच्या हिंदू समुदायाचा एक भावना दुखवण्याच काम या माध्यमातून झालेला आहे,तेव्हा आम्ही सर्वप्रथम सांगू इच्छितो की यशराज बॅनरने हा जो विषय केलेला आहे याचा तर आम्ही करणी सेनेच्या वतीने सर्व जण प्रथम निषेध नोंदवतो त्यांनी आमच्या भावना दुखावल्या हिंदूंचा एक मोठा सम्राट आणि त्याचा उल्लेख एकेरी भाषेत उल्लेख करणं अत्यंत चुकीची बाब आहे येत्या काही दिवसांमध्ये जर हा चित्रपट या एकेरी नावावे रिलीज झाला तर आम्ही संपूर्ण देशभर रस्त्यावर उतरून हा चित्रपट बंद पाडण्याचा इशारा राजपूत करणी संघटनेच्या वतीने राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्याम सिंह ठाकूर यांनी वाशिम येथे पत्रकार परिषद घेऊन दिला आहे...यावेळी राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता सूरज चौधरी ,लखनसिह ठाकूर उपस्थित होते.


महत्वाच्या बातम्याहवामान