• 25 June 2022 (Saturday)
  • |
  • |


पुण्याच्या महापौरांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा - कोर्ट

पुण्याचे भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोर्टाने मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. मोहोळ यांना सार्वजनिक स्वच्छतागृहाचं प्रकरण भोवलंय. संबंधित शौचालय ठेकेदार...



पुण्याचे भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोर्टाने मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. मोहोळ यांना सार्वजनिक स्वच्छतागृहाचं प्रकरण भोवलंय. संबंधित शौचालय ठेकेदार असलेल्या भााचाच्या मदतीने तोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. कोथरूडमधील भीमनगर भागातील नागरिकांनी ही जागा सोडून जावं, यासाठी महापौरांनी हे शौचालय तोडलं.मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या पत्नी जवळपास २० वर्षांपासून नगरसेवक पदावर आहेत. त्यांच्या वार्डातील हा प्रकार आहे. भीमनगरच्या नागरिकांना या ठिकाणाहून स्थलांतर करायला लावून त्या ठिकाणी गृहप्रकल्प सुरू करण्याचा मोहोळ यांचा प्लॅन असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.त्यानंतर नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली त्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


महत्वाच्या बातम्या



हवामान