• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


जात पाहून घर न देणाऱ्या बिल्डरचे लायसन्स रद्द करा - सचिन खरात RPI

औरंगाबाद मध्ये एक भयंकर प्रकार घडला आहे. चिखलठाणा भागात घर बुक करण्यासाठी गेलेल्या वकील कुटुंबियांना पहिले जात विचारली गेली व त्यानंतर त्यानां घर नाकारण्यात आले. त्यानंतर त्यांनी त्या बिल्डर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर...औरंगाबाद मध्ये एक भयंकर प्रकार घडला आहे. चिखलठाणा भागात घर बुक करण्यासाठी गेलेल्या वकील कुटुंबियांना पहिले जात विचारली गेली व त्यानंतर त्यानां घर नाकारण्यात आले. त्यानंतर त्यांनी त्या बिल्डर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आरपीआयचे अध्यक्ष सचिन खरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले चिखलठाणा भागात अनुसूचित वकिलाला जात पाहून घर देण्याचे नाकारले हा संविधानाचा आणि कायद्याचा अपमान आहे, अशा बिल्डरचे लायसन्स रद्द करून त्यांना औरंगाबाद जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान