• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


औरंगाबाद महानगपालिकासमोर रा. काँ आणि अ.भा.म.फुले समता परिषद यांचा कडून राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

आज दि १२ जानेवारी २०२२ बुधवार रोजी राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या ४२४ व्या जयंती निमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका कार्यालय समोर जयंती...आज दि १२ जानेवारी २०२२ बुधवार रोजी राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या ४२४ व्या जयंती निमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका कार्यालय समोर जयंती साजरी करण्यात आली कारण ज्या राजमाता जिजाऊ भोसले यांनी स्वराज्य निर्मितीसाठी आयुष्य खर्ची घातले आणि त्यांच्या नावावर आजचे राजकारणी पुढारी सत्ता उपभोगत आहेत त्यांना शहरात त्यांचे भव्यदिव्य स्मारक उभे करण्याचे सुध्दा भान राहिले नाही त्यांच्या विरुध्द संताप व्यक्त करण्यात आला. तसेच महानगरपालिका प्रशासन यांनी सुध्दा याप्रकरणी त्वरित लक्ष घालून पुढील जयंती पूर्वी राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांचे भव्य पुतळा बसविण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका उपायुक्त रविंद्र निकम यांना निवेदन देण्यात आले. यावर उपायुक्त रविंद्र निकम यांनी तात्काळ दखल घेऊन लेखी स्वरूपात आपल्या मागणीची दखल घेत येणाऱ्या जयंती पूर्वी शहरात पुतळा बसविण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या आवारात जयंती साजरी करण्याची मागणी केली असता प्रशासनाने आमची अडचण असल्याचे सांगितले त्यामुळे महानगरपालिका प्रवेशद्वारा समोर राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांचा पुतळा ठेवून जयंती साजरी करण्यात आली.राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांचा एकही पुतळा नसणे हि आम्हां सर्व मावळ्यांसाठी, बहुजनांसाठी लाजीरवाणी व खेदाची बाब आहे. एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली करोडो रुपयांची कामे शहरात सुरू असतांनी महानगरपालिकेतर्फे राजमाता जिजाऊ भोसले यांचा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून बहुजनांचे,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम रेंगाळते आहे पुढील महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून तत्पुर्वी क्रांतीचौक येथील पुतळ्याचे काम पूर्ण करा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी राजमाता जिजाऊ भोसले यांचा पुतळा शहरात बसविलाच पाहिजे,छत्रपती शिवाजी महाराज कि जय,छत्रपती संभाजी महाराज कि जय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बनसोड,महानगराध्यक्ष गजानन सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग शहराध्यक्ष निशांत पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ बी सी विभाग कार्याध्यक्ष योगेश हेकाडे शहर कार्याध्यक्ष गणेश काळे, शहाराध्यक्षा सुभद्रा जाधव, शहर कार्याध्यक्षा अरुणा तिडके मराठवाडा प्रसिध्दीप्रमुख संदीप घोडके, पश्चिम शहराध्यक्ष चंद्रकांत पेहरकर, शहर उपाध्यक्ष लक्ष्मण हेकडे,किशोर लोखंडे, संदीपराज हिंगे,पूर्व शहराध्यक्ष अनिल क्षिरसागर, गणेश हिवाळे, उमेश उबाळे, शिवाजी जाधव,शिवसेना उपशाखा प्रमुख केतन हेकडे, बाळू सोनवणे, गजानन लहासे, ज्ञानेश्वर जेजुरकर, वल्लभ तडवळकर, महिला आघाडी सविता जवणे, मालती निकम,राष्ट्रवादी युवती शहर उपाध्यक्ष धनश्री कुदळे, पुष्पा जाधव आदींची उपस्थिती होती.


महत्वाच्या बातम्याहवामान