• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे काम पूर्ण ! लवकर येणार औरंगाबादेत

क्रांती चौक मधील ज्या पुतळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले तो पुतळा पूर्ण झाला आहे. शिल्पाकृती लवकरच शहरात येणार असल्याची माहिती आमदार अंबादास दानवे यांनी दिली. पुण्यातील स्टुडिओमध्ये याचे काम सुरू आहे. बुधवारी अंबादास दानवे आणि...क्रांती चौक मधील ज्या पुतळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले तो पुतळा पूर्ण झाला आहे. शिल्पाकृती लवकरच शहरात येणार असल्याची माहिती आमदार अंबादास दानवे यांनी दिली. पुण्यातील स्टुडिओमध्ये याचे काम सुरू आहे. बुधवारी अंबादास दानवे आणि त्यांच्या टीमने त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे जुना पुतळा काढून नवा आणखी उंच पुतळा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पुण्यात शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे काम सुरु करण्यात आले होते. विशेष म्हणजे २१ फूट उंचीचा हा शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात मोठा अश्वारुढ पुतळा ठरणार आहे. पुण्यातील धायरी येथील चित्रकल्पक आर्ट स्टुडिओ येथे सुसरु आहे. आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे आणि त्यांचे सहकारी हा भव्य पुतळा साकारत आहे. नुकतीच विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनी पुण्यातील या पुतळ्याचे काम कुठवर आले आहे, याची पाहणी केली. हे काम जवळफास पूर्ण झाले असून लवकरच शहरात तो कधी आणायचा याचा निर्णय घेतला जाईल असे त्यानी सांगिले.


महत्वाच्या बातम्याहवामान