• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेटच्या शालेय साहित्याचे वाटप

६ डिसेंबर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेटच्या एक वही एक पेन अभियानाच्या माध्यमातुन जमा झालेले वही पेनचे वाटप आज १२ जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब तसेच स्वामी विवेकानंद ...६ डिसेंबर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेटच्या एक वही एक पेन अभियानाच्या माध्यमातुन जमा झालेले वही पेनचे वाटप आज १२ जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त फॅम फेस ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट तर्फे स्नेहालय संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालभवन उस्मानपुरा येथील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले, प्रसंगी ३०० वही आणि पेन गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले, तसेच याप्रसंगी मान्यवरांनी तसेच विद्यार्थ्यानी प्रबोधनपर भाषण केले. यावेळी ज्येष्ट मार्गदर्शक एन. एस कांबळे साहेब , स्नेहालय औरंगाबादच्या संचालिका राणी मॅडम निकाळजे , बनकर मॅडम , समाज कल्याण विभागाच्या अधिकारी भाग्यश्री जाधव मॅडम , प्रसिद्ध आंबेडकरी शाहीर प्रबोधनकार राजेश तुपे आधी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फॅम सदस्य डॉ विनीत कोकाटे , मनीष नरवडे, निलेश गवळी , गौतम बावस्कर , संदीप बोराडे , शैलेश चाबुकस्वार, आदीनी परिश्रम घेतले.


महत्वाच्या बातम्याहवामान