• 23 May 2022 (Monday)
  • |
  • |


औरंगाबादेत पार पडली एमआयएम विदयार्थी आघाडीची कार्यकारणी बैठक

एव्हरेस्ट एज्युकेशन सोसायटी जाटवाडा येथे आज एमआयएम विद्यार्थी आघाडी तर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्हातील कार्यकर्ते पदाधिकारी यांची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलीलयांच्या आदेशाने पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारणी...एव्हरेस्ट एज्युकेशन सोसायटी जाटवाडा येथे आज एमआयएम विद्यार्थी आघाडी तर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्हातील कार्यकर्ते पदाधिकारी यांची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलीलयांच्या आदेशाने पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारणी प्रमुख डॉ.गफ्फार कादरी व विद्यार्थी आघाडी अध्यक्ष डॉ. कुणाल खरात यांच्या प्रमुख उपस्थीतीत बैठक पार पडली. ही बैठक संघटना बांधणी हेतू, निवडणूका संदर्भात विद्यार्थी आघाडीची भूमिका , सभासद नोंदणी , उत्तरप्रदेश विधानसभा तसेच महानगरपालिका निवडणूक प्रचार अश्या अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी प्रदेशउपाध्यक्ष शाझाद खान, सचिव शाहनवाज खान , अब्दुल रहमान आलम खान ,प्रवक्ता रवीश मोमीन, सनिर् सय्येद् ,अज़ीम् पटेल , अवेज् शेख ,मोइन्मिन् खान, नवाज् कुरेशि , अकिब् खान ,शेहरोज् सिद्दिकि, हुसेद् खान फैजान शेख , राशीद खान, शारीक खान , सनाऊल्ला खान , नदीम अख्तर , आर्यन खान आदी प्रमुख उपस्थिती पार पडली.या बैठकीला मुंबई , ठाणे , मुंबरा , भिवंडी , कल्याण , नांदेड ,कोकन , नागपूर , अहमदनगर , या ठिकाणचे कार्यकर्ते उपस्थित होते.


महत्वाच्या बातम्याहवामान