• 24 May 2022 (Tuesday)
  • |
  • |


रिसोड येथे दीड कोटी पेक्षा जास्त किमतीचा गुटखा जप्त

वाशिम दि.२३ :(अजय ढवळे) रिसोड शहरातील वाढते अवैध धंदे व अवैध गुटका या संबंधित वाढत्या तक्रारी लक्षात घेता वाशीम स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक जाधव यांनी वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात आज दिनांक 23...वाशिम दि.२३ :(अजय ढवळे) रिसोड शहरातील वाढते अवैध धंदे व अवैध गुटका या संबंधित वाढत्या तक्रारी लक्षात घेता वाशीम स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक जाधव यांनी वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात आज दिनांक 23 जानेवारी रोजी दुपारी रिसोड शहरातील जुनी सराफा लाईन भागातील धोबी गल्ली परिसरातील एका जुन्या घरात छापेमारी करून तब्बल दीड कोटी रुपये पेक्षा जास्त प्रतिबंधित गुटका जप्त केला.या संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दुपारी चार वाजता रिसोड पोलीस स्टेशन मध्ये पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. बच्चन सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की त्यांना एक गोपनीय माहितीच्या आधारे असे कळाले होते की रिसोड शहरातल्या धोबी गल्ली परिसरात मोठ्याप्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची साठवण केलेली आहे. त्या आधारे बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूला संबंधित जागेवर छापेमारी करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदरील छापेमारी केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्वतः घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. गुटका हा धोबी गल्लीतील एका जुन्या घरातील तीन खोल्यांमध्ये साठवण करून ठेवलेला होता.जप्तीची कारवाईनंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून सदरील गुटखा संबंधित सर्व धागे-दोरे गोळा करण्याचे काम करणार असल्याचे बच्चन सिंह यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. गुटका कुठून आला व केव्हा आला या सर्व बाबी वर तपास केला जाईल असेही बच्चन सिंह यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव हे उपस्थित होते. रिसोड शहरात गुटका जप्तीची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान