• 25 June 2022 (Saturday)
  • |
  • |


५० ठिकाणी रिजेक्ट झाल्यानंतर या तरुणीला दिले तब्बल 'एवढे' पॅकेज

आत्मविश्वास आणि दृढ निश्चय असली कि या जगात आपण काही मिळवू शकते याचे जिवंत उदाहरण आपल्या देशात ठरले आहे. बिहारमधील २४ वर्षीय तरुणीने हे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. संप्रीति यादव या तरुणीला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी...



आत्मविश्वास आणि दृढ निश्चय असली कि या जगात आपण काही मिळवू शकते याचे जिवंत उदाहरण आपल्या देशात ठरले आहे. बिहारमधील २४ वर्षीय तरुणीने हे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. संप्रीति यादव या तरुणीला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या गुगलने एक कोटी १० लाखांचं वार्षिक पॅकेज दिलं आहे. संप्रीतिने तब्बल ५० ठिकाणी मुलाखत देऊन अपयशी झुंज दिली. दिल्ली टेक्नोलॉजिकल यूनिव्हर्सिटीमधून कंप्युटर सायन्समध्ये २०२१ मध्ये संप्रीती बी टेकचं शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाली. गुगलच्या मुलाखतीच्या एकूण नऊ फेऱ्या झाल्या. या फेऱ्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि वेगवेगळ्या विषयांवर उमेदवारांच्या आकलन शक्तीची चाचणी घेण्यात आली. संप्रीतिने या मुलाखतीमध्ये चांगली कामगिरी करत सर्व फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. त्यानंतर गुगलने तिला वर्षाला १ कोटी १० लाख रुपयांची ऑफर दिली. म्हणजेच महिन्याला जवळजवळ ९ लाखांच्या आसपास पगार दिला ऑफर करण्यात आला. संप्रीतिने ही गुगलची ऑफर स्वीकारलीय. १४ फेब्रुवारीपासून २४ वर्षीय संप्रीति गुगलमध्ये रुजू झाली आहे.संप्रीतिला गुगलच्या आधी मायक्रोसॉफ्टनेही नोकरीची ऑफर दिली होती. तिने त्या मुलाखतीबाबतीत सांगितले कि, “मुलाखतींच्या वेळेस माझा फार गोंधळ उडायचा. मात्र मला पाठिंबा देणारे माझे पालक आणि जवळचे मित्र यांनी मला कायमच अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मी रोज अनेक तास मोठ्या कंपन्यांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी वाचन करायचे. अनेक मोठ्या कंपन्यांमधील मुलाखती म्हणजे एखाद्या चर्चेसारख्या असल्याने त्या कंपन्यांबद्दलची माहिती असणं हे फार महत्वाचं असतं,” असं संप्रीति सांगितले.


महत्वाच्या बातम्या



हवामान