सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे : सुखसागरनगर परिसरात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून, पतीला अटक करण्यात आली आहे. विजया नितीन कांबळे...पुणे : सुखसागरनगर परिसरात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून, पतीला अटक करण्यात आली आहे. विजया नितीन कांबळे (वय ३९, रा. सुखसागरनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी याबाबत विजया यांच्या आईने तक्रार दिली आहे. त्यानुसार पती नितीन वामन कांबळे (वय ४८) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजया व नितीन यांचा विवाह झाल्यानंतर किरकोळ कारणावरून वाद होत होते. विजया यांनी माहेरहून पैसे घेऊन यावे; म्हणून नितीन याने त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्यानी १९ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करत आहेत.

हवामान