मिस्ट्री आणि थ्रिलने भरलेला द बॉडीचा ट्रेलर रिलीज

अभिनेते ऋषी कपूर आणि इम्रान हाश्मी ही जोडी आगामी ‘द बॉडी’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. या चित्रपटाची कथा अत्यंत गूढ आणि थरारक आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. एका महिलेच्या हरवलेला मृतदेहाच्या...अभिनेते ऋषी कपूर आणि इम्रान हाश्मी ही जोडी आगामी ‘द बॉडी’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. या चित्रपटाची कथा अत्यंत गूढ आणि थरारक आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. एका महिलेच्या हरवलेला मृतदेहाच्या शोधात सर्व पात्र ‘द बॉडी’च्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. बेपत्ता झालेल्या बॉडीचा तपास ऋषी कपूर करत आहेत. हरवलेला मृतदेह शोभिता धुळीपाला हीचा असल्याचे सांगितले जात आहे. तिचे शरीर गायब झाल्यानंतर एन्ट्री होते इम्रान हाश्मीशीची, जो चित्रपटात तिच्या पतीच्या भूमिकेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून स्पष्ट होते की, हा चित्रपट मिस्ट्री आणि थ्रिलने भरलेला आहे. ‘द बॉडी’ नावाच्या स्पॅनिश चित्रपटावरून हा चित्रपट प्रेरित आहे. जितू जोसेफने याचे दिग्दर्शन केले आहे, तर हा चित्रपट 13 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

हवामान