मध्य प्रदेश / विधानसभेचे कामकाज २६ मार्च पर्यंत स्थगित; अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले राज्यपाल

भोपाळ - मध्य प्रदेशातील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आजही फ्लोअर टेस्ट होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. एकूणच राज्य आणि विधिमंडळाची परिस्थिती लक्षात घेता सभागृहाचे कामकाज २६ मार्च पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. यासोबतच, काँग्रेसवर...भोपाळ - मध्य प्रदेशातील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आजही फ्लोअर टेस्ट होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. एकूणच राज्य आणि विधिमंडळाची परिस्थिती लक्षात घेता सभागृहाचे कामकाज २६ मार्च पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. यासोबतच, काँग्रेसवर अविश्वास ठरावाची नामुष्की तूर्तास टळली आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेस आणि सीएम कमलनाथ यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. काँग्रेसला बहुमत सिद्ध करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला असेही सांगितले जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, याच दिवशी राज्यसभा निवडणूक सुद्धा होणार आहे. अभिभाषण अर्धवट सोडून निघाले राज्यपाल मुख्यमंत्री कमलनाथ यांनी संसदीय कामकाज मंत्री गोविंद सिंग, राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील विवेक तनखा यांच्याशी चर्चा केली आणि विधानसभेत पोहोचले. या घटनेच्या अवघ्या अर्ध्या तासानंतर राज्यपाल लालजी टंडन विधानसभेत दाखल झाले. परंतु, आपले अभिभाषण ते पूर्ण करू शकले नाहीत. राज्यपाल यानंतर लोकशाही मूल्यांचे जतन करा असे म्हणत विधानसभेच्या बाहेर निघाले. दरम्यान, कमलनाथ यांनी राज्यपालांना एक पत्र पाठवले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आज अविश्वास ठरावाची प्रक्रिया शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. सोबतच, विधिमंडळात बहुमत चाचणी घेणे लोकशाही विरोधी आहे असेही ते पुढे म्हणाले. सीएम हाउसबाहेर सुरक्षा रक्षक २४ तास सतर्क मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वारावरून कुणालाही एंट्री दिली जात नाही. एका सुरक्षा रक्षकाने सांगितल्याप्रमाणे, आम्ही २४ तास ऑन ड्युटी आहोत. केवळ जेवनासाठी आम्हाला सोडले जात आहे. सीएम हाउसमध्ये कुठल्याही प्रकारच्या हालचाली नाहीत. काही रिकामी वाहने या निवासस्थानात गेली होती. गार्ड लावण्यापूर्वीच काही मंत्री या निवासस्थानात थांबल्याची शक्यता आहे.

हवामान