इंटरव्ह्यू / अनुष्का म्हणाली, ‘प्रभास माझा सर्वांत जवळचा मित्र आहे, पहाटे ३ वाजताही त्याच्याशी बोलू शकते’

बॉलिवूड डेस्कः अनुष्का शेट्टीने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रथमच आपल्या 15वर्षांचे करिअर, लिंक अप्स, लग्न आणि जवळच्या मित्रांबाबत सांगितले. जाणून घेऊया काय म्हणतेय अनुष्का.... ‘2005 मध्ये ‘सुपर’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होते त्यावेळी...बॉलिवूड डेस्कः अनुष्का शेट्टीने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रथमच आपल्या 15वर्षांचे करिअर, लिंक अप्स, लग्न आणि जवळच्या मित्रांबाबत सांगितले. जाणून घेऊया काय म्हणतेय अनुष्का.... ‘2005 मध्ये ‘सुपर’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होते त्यावेळी मला पळून जायचे होते. या क्षेत्रात आले तेव्हा मी नवखी होते. मला या क्षेत्राला समजून घेण्यास दोन वर्षे लागलीत. माझ्या आजूबाजूचे लोक खूप पाठिंबा देणार होते. परंतु, मी स्वत:ला खूप कमजोर समजते आणि मजबूत करण्याचा प्रयत्न करत होते. कोणतेही प्रोफेशन तुम्हाला जे शिकवू शकत नाही ते चांगल्या प्रकारे चित्रपटसृष्टी शिकवू शकते. मी खूप लाजरी आहे आणि स्टिल कॅमेरासमोर मोकळेपणाने वावरू शकत नाही. याच कारणामुळे मी कधीच सेल्फी काढत नाही आणि इतरांप्रमाणे सोशल मीडियावरही सक्रिय नाही.' आयुष्यात मित्रच सर्वकाही ‘मी चित्रपटाचे चित्रीकरण करत नाही त्यावेळी मला फोटोग्राफी आणि प्रवास करायला आवडताे. याशिवाय बालपणीच्या मित्रांचा एक छोटासा ग्रुप आहे. या क्षेत्रात नानी, राणा, प्रभास आणि सुप्रिया सारखे मित्रही आहेत. प्रभासला मी 15 वर्षांपासून ओळखते आणि तो माझा सर्वांत आवडता मित्र आहे. जर मला पहाटे 3 वाजताही काही अडचण असेल तर मी त्याच्याशी त्यावेळी बोलू शकते. आम्ही दोघेही विवाहित नसल्यामुळे आमचे नाव जोडले जाते आणि पडद्यावर लोकांना आमची जोडीही खूप आवडते.' लग्न आणि संबंध ‘लग्न माझ्यासाठी पवित्र बंधन आहे. ज्यावेळी योग्य व्यक्ती भेटेल तर आपोआपच सर्व गोष्टी समोर येतील. माझे 2008 मध्ये एका व्यक्तीशी खूप सुंदर नाते होते. मी त्या व्यक्तीचे तुम्हाला नाव सांगू शकत नाही. हे खूप खासगी आहे, आम्ही आतापर्यंत सोबत असतो तर मी नक्कीच नाव सांगितले असते. आम्ही एकमेकांच्या सहमतीने आमचे नाते तोडले आहे. आजही मला आमच्या नात्याचा खूप आदर आहे. लग्नाबाबत सांगायचे झाले तर, मी खूप भावनिक आहे. वेळ आल्यावर सर्व चांगले होणार हे माझ्या आई-वडिलांना माहीत आहे.' गॉसिपमुळे त्रास होतो ‘मी एका पाठोपाठ एक अशा बऱ्याच चित्रपटात काम केल्यामुळे मला शारीरिक आणि मानसिक थकवा आला होता. याशिवाय मला पाठीला दुखापत झाली होती यासाठी तीन आठवडे आरामही केला. या दरम्यान माझे वजन वाढले. माझ्या थोडा बदल दिसायला लागला आणि या क्षेत्रात असे काही बदल दिसायला लागले की काहीही लिहिले जाते. माझे वजन आणि लिंक अप्सबाबत खूप काही लिहिले गेले. अशा अफवांकडे मी दुर्लक्षही केले,परंतु काही गोष्टींमुळे खरंच खूप दुखावले गेले. जे लोक माझ्याबाबत लिहितात त्यांनाही आई-बहिणी आणि मुलेही असतीलच ना? अशा लोकांमुळे टीव्ही पाहणे आणि वर्तमानपत्र वाचणेही बंद केले आहे. मला अशा गोष्टी आता माझ्या मित्रांकडूनच समजतात. अशाप्रकारच्या लग्नासंबंधीच्या अफवांचा आता माझ्या कुटुंबीयांवर काहीच परिणाम होत नाही.’

हवामान