मंडे पॉझिटिव्ह / क्रिस्टियानो रोनाल्डोचा मदतीसाठी पुढाकार, दोन्ही हॉटेलचे रुग्णालयात रूपांतर; कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, वैद्यकीय पथकाला देतोय वेतन

लिस्बन - कोरोना व्हायरसचा दिवसेंदिवस धोका वाढत आहे. त्यामुळे जगभरामध्ये याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील महामारी म्हटली जात आहे. याच्या वाढत्या धोक्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले...


लिस्बन - कोरोना व्हायरसचा दिवसेंदिवस धोका वाढत आहे. त्यामुळे जगभरामध्ये याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील महामारी म्हटली जात आहे. याच्या वाढत्या धोक्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. याची धास्ती अधिकच वेगाने वाढत आहे. हीच बाब लक्षात घेऊन आता पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो मदतीसाठी धावून आला आहे. त्याने या जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण झालेल्याच्या मदतीसाठी आता पुढाकार घेतला. यासाठी त्याने आपल्या दोन आलिशान आणि सर्वात महागड्या मानल्या जाणाऱ्या हॉटेलमध्येच वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. यातूनच त्याचे ण्R७ हॉटेल आता रुग्णालयासारखेच वाटत आहे. या ठिकाणी रोनाल्डोच्या पुढाकारातून बाधित रुग्णांवर तज्ञ वैद्यकीय पथकाकडून तत्काळ उपचार सुरू आहेत. या सर्वांना वैद्यकीय उपचार देणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्स यांना रोनाल्डोकडून वेतन दिले जात आहे. त्यामुळे आता रोनाल्डोच्या या सामाजिक कार्याची फुटबॉॅलच्या विश्वात चांगलीच चर्चा रंगत आहे. त्याच्या याच कार्यासाठी अमेरिकेच्या लीगमधील खेळाडूंनी आतापर्यंत ५४ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. व्यक्ती म्हणूनच मला या महामारीची चिंता : रोनाल्डो आपण फुटबॉलपटूनंतर आहे, आधी मी व्यक्ती म्हणूनच जगात निर्माण झालेल्या जीवघेण्या महामारीचा विचार करत आहे. या वाढत्या धोक्याची मलाही मोठी चिंता वाटत आहे, अशा शब्दांत रोनाल्डोने ट्विट केले आहे. त्याच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले जात आहे. ‘आपण या कार्यासाठी एक व्यक्ती, वडील आणि भाऊ या साऱ्या भूमिकेतूनच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे याची सर्वांना मदत होईल, असे तो म्हणाला. त्याच्या या कार्यामुळे स्थानिक नागरिकांमधील भितीचे वातावरण दुर होत आहे.

हवामान