केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय, चहा पावडरचा असा करा वापर

केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय, चहा पावडरचा असा करा वापर चहा तयार केल्यानंतर बहुतांश जण चहा पावडर कचऱ्याच्या डब्यात फेकतात. कारण चहा प्यायल्यानंतर चहा पावडर टाकाऊ घटक झाल्याचा आपला समज आहे. पण या चहा पावडरचा तुम्हाला कित्येक प्रकारे...


केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय, चहा पावडरचा असा करा वापर चहा तयार केल्यानंतर बहुतांश जण चहा पावडर कचऱ्याच्या डब्यात फेकतात. कारण चहा प्यायल्यानंतर चहा पावडर टाकाऊ घटक झाल्याचा आपला समज आहे. पण या चहा पावडरचा तुम्हाला कित्येक प्रकारे वापर करता येऊ शकतो. यापैकीच एक म्हणजे चहा पावडरचा तुम्ही हेअर डाय म्हणून वापर करू शकता. चहा पावडरच्या मदतीनं तुमच्या पांढऱ्या केसांना नैसर्गिकरित्या काळा रंग मिळेल. चहा पावडरमध्ये टॅनिन अ‍ॅसिड असतं, या गुणधर्मामुळे पांढरे केस काळे होतात. चहा पावडरसोबत अन्य घरगुती सामग्रीचाही समावेश करून करू शकता. जाणून घेऊया चहा पावडरमुळे पांढरे केस कसे काळे होतात? पहिली पद्धत : सामग्री- १ लीटर पाणी १० चमचे चहा पावडर/ टी बॅग विधि - एका पॅनमध्ये पाणी उकळण्यास ठेवा. त्यामध्ये १० चमचे चहा पावडर टाका. मध्यम आचेवर चहा पावडर उकळत ठेवा. यानंतर गॅस बंद करा आणि चहाचं पाणी थंड होण्यास ठेवून द्या. एका हेअर ब्रशच्या मदतीनं चहा पावडरचं मिश्रण आपल्या केसांना त्यांच्या मुळांपर्यंत लावा. ३० मिनिटांसाठी हा पॅक केसांना लावून ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्यानं केस स्वच्छ धुवा.

हवामान