औरंगाबाद / मोबाइल देण्यास नकार देणाऱ्या तरुणाचा संग्रामनगरजवळ खून; मृत तरुण परभणीचा, स्पर्धा परीक्षेसाठी शहरात

औरंगाबाद- मोबाइल देण्यास नकार दिल्याने अनोळखी तरुणांनी एका युवकाचा खून केला. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजता संग्रामनगर म्हाडा कॉलनी परिसरात घडली. अक्षय महेश प्रधान (२२) असे मृताचे नाव असून तो परभणीचा रहिवासी होता. स्पर्धा परीक्षांच्या...औरंगाबाद- मोबाइल देण्यास नकार दिल्याने अनोळखी तरुणांनी एका युवकाचा खून केला. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजता संग्रामनगर म्हाडा कॉलनी परिसरात घडली. अक्षय महेश प्रधान (२२) असे मृताचे नाव असून तो परभणीचा रहिवासी होता. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तो आई व बहिणीसह औरंगाबादेत राहत होता. अक्षय हा एकुलता एक असून त्याला वडील नाहीत. मित्र अमेय भोसले याला भेटण्यासाठी तो रात्री म्हाडा कॉलनीत आला होता. रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास हे दोघे जण गाडीवर तेथून जवळच असलेल्या मैदानाजवळ गेले. काही वेळातच तिथे दोन अनोळखी तरुण मोटारसायलवर आले. त्यातील एकाच्या हातामध्ये साप होता. आरोपींपैकी एकाने अक्षयकडे त्याचा मोबाइल मागितला, त्याने नकार दिला. तेव्हा आरोपींनी त्याच्याकडून तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, अक्षयने विरोध केला. त्यामुळे आरोपीने अक्षयच्या पाठीमागून मानेजवळ चाकू मारला व मोबाइल घेऊन आरोपी पळून गेले. जखमी अवस्थेतील अक्षयच्या मदतीसाठी अमेय जोरजोराने ओरडू लागला. तेव्हा परिसरातील नागरिक धावत आले. अक्षय हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. नागरिकांनी अक्षयसाठी रुग्णवाहिका बोलावली, मात्र ती येईपर्यंत अक्षयने घटनास्थळीच प्राण सोडला होता. सहायक पोलिस आयुक्त रवींद्र साळुंखे, पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव, सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे, पोलिस उपनिरीक्षक भारत पाचोळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हातात साप घेऊन फिरणारा मारेकरी अक्षयचा मोबाइल हिसकावून घेणाऱ्या दोघांपैकी एकाच्या हाताला साप गुंडाळलेला होता़. अक्षयला चाकू मारल्यानंतर हे दोघे उड्डाणपुलाखाली टपरीवर थांबले. खून केल्यानंतर उड्डाणपुलाच्या दिशेने जात असताना ते एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हे फुटेज पोलिसांनी हस्तगत केले आहे.

हवामान