प्रशांत दामलेंनी पडद्यामागील सहका-यांना दिला आर्थिक मदतीचा हात, २३ जणांना केली प्रत्येकी दहा हजारांची मदत

एंटरटेन्मेंट डेस्कः सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरु आहे. महाराष्ट्रातही कोरोनाने शिरकाव केल्याचे निष्पन्न झाले असून सध्या महाराष्ट्रात कोरोना दुसऱ्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे सरकार सावध झाले असून, लॉक...एंटरटेन्मेंट डेस्कः सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरु आहे. महाराष्ट्रातही कोरोनाने शिरकाव केल्याचे निष्पन्न झाले असून सध्या महाराष्ट्रात कोरोना दुसऱ्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे सरकार सावध झाले असून, लॉक डाऊनच्या दिशेने पावले पडत असल्याचे एकून उपाययोजनांवरून दिसत आहे. चित्रपट, टीव्ही आणि नाट्यसृष्टीनेही ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. पण नाट्यसृष्टीतील तंत्रज्ञ किंवा बॅकस्टेज आर्टिस्टचे कुटुंब हे प्रत्येक प्रयोगातून मिळणा-या पैशांवर चालते. सध्या काही दिवसांसाठी नाटकांचे प्रयोग बंद झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रशांत दामले यांनी पडद्यामागे काम करणा-या २३ जणांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. अडचणीत सापडलेला हा व्यवसाय कधी सुरळीत होईल याची अजून खात्री नाही. पण तोपर्यंत कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी प्रशांत दामलेंनी केलेली मदत ही नक्कीच कौतुकास्पद आणि सामाजिक जबाबदारीचे भान दर्शवणारी आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्रीने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून प्रशांत दामले यांच्या या कार्याची माहिती दिली. पुष्करने लिहिले, प्रशांत दामले... मानला तुम्हाला! कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नाट्यगृह बंद केली असताना, हातावर पोट असणाऱ्या आपल्या नाट्यकुटुंबातल्या २३ जणांना प्रशांत दामले यांनी प्रत्येकी १००००/- रुपये दिले. अशी दानत दाखवणाऱ्या एका आदर्श आणि काळजीवाहू निर्मात्याला मनापासून सलाम!.

हवामान