औरंगाबाद / मोठ्याने मुलीला पळवल्याचा संशय; लहान भावाचे मुंडके छाटून टाकले

वैजापूर - शेजारच्या वस्तीवर राहणाऱ्या तरुणाने मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून तरुणीचे वडील आणि चुलत्याने शेजारच्या शेतवस्तीवरील कुटुंबीयांवर शनिवारी सशस्त्र हल्ला करून बेपत्ता असलेल्या तरुणाचा लहान भाऊ भीमराज बाळासाहेब...


वैजापूर - शेजारच्या वस्तीवर राहणाऱ्या तरुणाने मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून तरुणीचे वडील आणि चुलत्याने शेजारच्या शेतवस्तीवरील कुटुंबीयांवर शनिवारी सशस्त्र हल्ला करून बेपत्ता असलेल्या तरुणाचा लहान भाऊ भीमराज बाळासाहेब गायकवाड (१७) याचा तलवारीने मुंडके धडापासून वेगळे करून खून केला. या हल्ल्यात तरुणाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. लाख खंडाळा (ता. वैजापूर) येथे घडलेल्या या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्यावर खुनासह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब गायकवाड यांचा मुलगा अमोल (२२) १२ मार्चपासून बेपत्ता आहे. शेजारील देवकर वस्तीवरील देविदास छगन देवकर याची २४ वर्षीय मुलगीही बेपत्ता आहे. अमोल यानेच या मुलीला पळवून नेल्याचा संशय देवकर कुटुंबीयांना आहे. त्यामुळे त्यांनी सूडभावनेतून ही हत्या केली.

हवामान