औरंगाबाद : कोरोना काळात देहदान करण्याचे प्रमाण कमी झाले.मृत्यूनंतर आपले देहदान करावे अशी अनेकांची उच्च असते.अशीच इच्छा रतनचंद कटारिया या ८६ वर्षीय वृद्धाने आपल्या कुटुंबाकडे व्यक्त केली होती.वेदांतनगर येथे राहणारे रतनचांद यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या निधनानंतर त्यांची देहदानाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबीयांनी प्रयत्न केले.त्यानंतर रतनचंद यांची मृत्यूनंतर अँटिजन टेस्ट करण्यात आली.ही टेस्ट निगेटिव्ह आली आणि रतनचंद यांची देहदानाची इच्छा पूर्ण झाली.
रतनचंद कटारिया हे विजय कटारिया यांचे वडील तर डॉ. माया कटारिया यांचे सासरे होते.रतनचंद यांच्या इच्छेनुसार घाटी रुग्णालयास त्यांचा देहदान करण्यात आला.शिवाय या देहदानामुळे एका गरजू रुग्णाला दृष्टीही मिळणार आहे. दरम्यान,याविषयी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डाॅ. प्रतिमा कुलकर्णी यांनी सांगितले की,'कोरोनामुळे देहदानावर परिणाम झाला. परंतु आता मृत्यूनंतर कोविड टेस्ट करून देहदान करता येत आहे. या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह असेल तर देहदान स्वीकारता येत आहे'.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य