• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


देशात तिसरी लाट ओमिक्रॉनची असू शकते - राजेश टोपे


काळजी न घेतल्यास देशात कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉनची असू शकेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले
जगात नुकताच आलेला ओमिक्रॉन विषाणू सध्या सर्वच देशात थैमान घालत आहे. चिंताजनक बाब म्हणजे या कोरोनाचा नव्या विषाणूचे बाधित रुग्ण देशात आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.काल कर्नाटक आणि आज गुजरात मध्ये ओमिक्रॉन रुग्ण आढळून आले. याचा महाराष्ट्रातील परिस्थितीवर कसा परिणाम होऊ शकतो याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची विधाने केली आहे.त्यांनी म्हटलंय की, ज्याप्रमाणे कर्नाटकात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून आणखी काही रुग्ण सापडले. तर या सगळ्यामुळे आणखी संसर्ग वाढण्याची भीती नक्कीच वाटते. त्यामुळे त्याची काळजी आपल्याला घ्यायलाच पाहिजे. काळजी न घेतल्यास देशात कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉनची असू शकेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. ओमिक्रॉनन धोकादायक नाही पण त्याचा संसर्ग वेगाने होतो, असं ते म्हणाले.निर्बंध बाबत ते म्हणाले लगेच निर्बंध लागू करणं हे जाचक होईल, ते त्रासदायक ठरेल म्हणून सध्या निर्बंधांची आवश्यकता नक्कीच नाही, असे राजेश टोपे म्हणाले.

हवामान