• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


Digital payments होणार महाग ? जाणून घ्या सविस्तर


एमपीसीनं आपली अनुकूल भूमिका कायम ठेवलीय. गेल्या वर्षी मार्चमध्ये (वर्ष 2020) आरबीआय(RBI)नं रेपो दरात 0.75 टक्के आणि मेमध्ये 0.40 टक्के कपात केली
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी चलनविषयक धोरण समितीचे चौथे द्विमासिक चलनविषयक धोरण सादर केले. यावेळी शक्तिकांत दास यांनी व्याजदर स्थिर ठेवण्याची घोषणा केली. रेपो दर 4 टक्के, रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आलाय. एमपीसीनं आपली अनुकूल भूमिका कायम ठेवलीय. गेल्या वर्षी मार्चमध्ये (वर्ष 2020) आरबीआय(RBI)नं रेपो दरात 0.75 टक्के आणि मेमध्ये 0.40 टक्के कपात केली होती. या कपातीनंतर रेपो दर ४ टक्क्यांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर आला होता.RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी डिजिटल पेमेंटविषयी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल पेमेंटवर शुल्क आकारण्याबाबत एक पत्रक जारी करेल. यावरून हे स्पष्ट झालंय, की येत्या काळात आपल्या सर्वांना डिजिटल पेमेंटच्या बदल्यात अतिरिक्त शुल्क भरावं लागणाराय. RBI देखील UPI आधारित फीचर फोन उत्पादनं लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे गव्हर्नर म्हणाले.


महत्वाच्या बातम्याहवामान