• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


व्हॉट्सअँप वापरकर्त्यांनो सावधान ! 'ह्या'आठ चुका केल्या तर होऊ शकते तुमचे खाते बंद


अटींचेउल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत ३०.२७ लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर बंदी घालण्यात आली
कुठल्याही कामासाठी सर्वाधिक व्हॉट्सअँपचा उपयोग केला जातो. परंतु याचा गैरफायदा पण जास्त होताना दिसत आहे. त्यामुळे सेवा अटींचेउल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत ३०.२७ लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर बंदी घालण्यात आली होती. नवीन IT नियमावली (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता २०२१) भारतात अनिवार्य असल्याने, व्हॉट्सअँप भारतातील वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारींना कसा प्रतिसाद देते आणि काय कारवाई करते. भारतात चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवण्यासाठी व्हॉट्सअँप चा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे अनेक घटनांतून समोर आलं आहे. त्यामुळे दंगलीसह अनेक कायदा आणि सुव्यवस्थेच्या घटना घडून येतात. हेच रोखण्यासाठी व्हॉट्सअँपने प्लॅटफॉर्मने आपल्या गैरवापर रोखण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. 1. जर तुम्ही कोणाचे फेक अकाउंट बनवलं असेल, तर व्हॉट्सअँप तुमचे अकाउंट बॅन करेल. 2. जर एखादी व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसेल आणि तुम्ही त्या व्यक्तीला खूप मेसेज पाठवले तरीही व्हॉट्सअँप तुम्हाला बॅन करू शकते. 3. तुम्ही थर्ड पार्टी अॅप्स जसे की WhatsApp Delta, GBWhatsApp, WhatsApp Plus इत्यादी वापरत असाल तर WhatsApp तुमच्यावर बंदी घालू शकते. 4. जर तुम्हाला खूप जास्त यूजर्सनी ब्लॉक केले असेल तर या परिस्थितीतही व्हॉट्सअँप तुम्हाला बॅन करू शकते. हेही वाचा: आता व्हॉट्सअँप ठेवणार फेक मेसेजवर अंकुश... 5. जर अनेक लोकांनी तुमच्या व्हॉट्सअँप अकाऊंटविरोधात तक्रार केली तर तुमच्यावर बंदी येऊ शकते. 6. तुम्ही युजर्सना मालवेअर किंवा फिशिंग लिंक पाठवल्यास, व्हॉट्सअँप तुमच्यावर बंदी घालेल. 7. व्हॉट्सअँपवर अश्लील क्लिप, धमक्या किंवा बदनामीकारक संदेश पाठवू नका. 8. व्हॉट्सअँप वर हिंसेला प्रोत्साहन देणारे बनावट संदेश किंवा व्हिडिओ पाठवू नका.

हवामान