• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


औरंगाबाददेत वेब सिरीज 'अनुराधा' च्या टिमने माध्यमांशी साधला संवाद


अनुराधा या वेब सिरीजच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम औरंगाबाद मध्ये हजर होती
अनुराधा या वेब सिरीजच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम औरंगाबाद मध्ये हजर होती.यावेळी दिग्दर्शक संजय जाधव आणि मुख्य अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी मुक्त पणे संवाद साधला. सर्व पत्रकारांच्या प्रश्नाचे मुक्तपणे दिलखुलास पद्धतीने उत्तर दिले. त्यांनी चित्रपटात झालेल्या चांगल्या वाईट अनुभव सर्वांसमोर मांडला. बॅन लिपस्टीक हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड पसरत आहे ही मोहीम नक्की आहे तरी काय हे जाऊन घेण्यासाठी ही वेब सिरीज तुम्ही नक्की पहा. ही मोहीम कुठल्याही कंपनीचा निषेध नसून हे फक्त प्रमोशन आहे. त्यामुळे वेब सिरीज बघितल्या नंतर सर्व प्रश्नाचे उत्तर मिळतील असे त्यांनी सांगितलं 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर 'अनुराधा' ही वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक संजय जाधव करत आहे. या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सचित पाटील, विद्याधर जोशी, सुशांत शेलार, सुकन्या कुलकर्णी दिसतील. 'अनुराधा' एक सस्पेन्स थ्रिलर वेबसीरिज आहे. अनेक लोकप्रिय सिनेमांचे दिग्दर्शन करणारा संजय जाधव 'अनुराधा'च्या निमित्ताने पहिल्यांदाच वेबसीरिज करत आहे. यामुळेच हा एक नवा अनुभव असल्याचे त्याने सांगितले. 'तेजस्विनी एक गुणी कलाकार आहे. तिला समोर ठेवूनच ही वेब सिरीज बनवली आहे आणि या वेब सिरीजसाठी कुठलेही ऑडिशन झाले नाही. वेब सिरीज बघितल्यावर सर्वांना समजेल की तेजस्विनीच का या वेब सिरीज हवी आहे हे कळेल त्यासाठी नक्की अनुराधा बघा असे त्यांनी संजय जाधव यांनी सांगितले. प्लॅनेट मराठी' सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्वतःची पहिली वेबसीरिज लाँच करता येणे ही एक मोठी संधी आहे. एकूण सात भाग या सिरीजचे आहेत असे संजय जाधवने सांगितले. 'अनुराधा' वेबसीरिज प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.


महत्वाच्या बातम्याहवामान